प्रिय मित्र आणि मैत्रिणींनो...
खूप दिवसांपासून मैत्रीणींवर ब्लॉग लिहिण्याची इच्छा होती. परंतु योग येत नव्हता. प्रत्येकाच्या आयुष्यात मैत्रीणी येत असतात. काहीचें मैत्रीचे रुपांतर प्रेमात होते, तर काही जण छान मैत्री आयुष्यभर टिकवतात. तर काहींच्या नशिबात मैत्री टिकत नसते. प्रत्येकाचे वेगवेगळे अनुभव असतात. तसाच माझाही वेगवेगळ्या मैत्रीणींबाबत अनुभव तुमच्याशी शेअर करणार आहे. तुमचे ही अनुभव पाठवत राहा. आपण सर्वजण मैत्री या विषयावर लिहीत जाऊ.
काही गोष्टी कशा "योगायोगाने' घडत असतात ना?काल ही अशीच घटना घडली मैत्रीणीबाबत... आम्ही दोघे शेजारी-शेजारी राहणारे खूप चांगली मैत्रीण. परंतु काही कारणामुळे लग्न होऊ शकले नाही. तीचे सुद्धा लग्न झाले आणि मी ही दुसऱ्या ठिकाणी राहावयास गेल्यामुळे भेट होत नव्हती.परंतु, काल योगायोगाने काही कामानिमित्त जुन्या ठिकाणी जाण्याचा योग आला होता. आणि खूप वेळ थांबावे लागणार होते त्यामुळे घरी तशी कल्पाना दिली होती.जुन्या ठिकाणी गेल्यावर जुन्या आठवणी जागृत झाल्या होत्या. इतरांशी बोलत असतानाही मन कशात लागत नव्हते. किती वर्षे आम्ही एकत्र घालवले होते. किती-किती गप्पा मारल्या होत्या. सगळा भूतकाळ आठवत होता. पण आज ती माझ्या बरोबर नव्हती. लग्न होऊन दूर गेल्यामुळे आज भेट होईल याची पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. परंतु योगायोग म्हणा नाहीतर काही म्हणा परंतु ती अचानक समोर आली. खूप वर्षांनी दिसल्यामुळे मी तर पहिल्यांदा ओळखले सुद्धा नव्हते. परंतु तीने गोड हासून "हाय' केले. काळजात एकदम धस्स झाले. ती आज भेटेल म्हणून वाटले सुद्धा नव्हते. परंतु खूप-खूप आनंद झाला. तिने बाजूला येण्याचा इशारा दिला. मी ही थोडे काम असल्याचे सांगून बाजूला गेलो.किती वर्षांनी दोघेच एकत्र आलो होतो. पण दोघात एक सिमारेषा होती. दोघांचे ही लग्न झाले होते. खूप-खूप दोघांच्या संसाराच्या, मुलांच्या गप्पा मारल्या. दीड तास गप्पा मारत होतो. आज पण पाहा ना, ती सुद्धा एकटीच आली होती आणि मी सुद्धा. जुन्या आठवणींना उजाळा देत होतो. तु सुखी आहेस का? या प्रश्नावर मात्र तिच्या डोळ्यातून आश्रू आले. बंधनांमुळे मात्र मी ते आश्रू पुसू शकत नव्हतो. तशी ती सुद्धा संसारात खूप सुखात होती. परंतु जुन्या गोष्टी आठवत गेलो आणि मन भुतकाळात अक्षरशः बुडून गेले. आज किती वर्षांनी किती-किती गप्पा मारल्या ना आपण? किती छान वाटले ना? आपली भेट होईल असे वाटले सुद्धा नव्हते, असे अनेक प्रश्न सुरू असताना खिशातील मोबाईल वाजला. मोबाईल पाहतो तर घरून फोन होतो. मी रिसिव्ह केला.हॅलो... पुढचा आवाज होता.... पप्पा लवकर घरी या ना, मला तुमच्या बरोबर खेळायचे आहे. मनाला एकदम झटका बसल्यासारखे झाले. पुढचा आवाज होता बायकोचा... आजून किती वेळ लागणार आहे.... मी तुमच्यासाठी जेवणाचे थांबले आहे.....कशी वेळ येतेना, एकीकडे खूप वर्षांनी भेटलेली मैत्रीण तर दुसरीकडे घर... मैत्रीणीने ओळखून घेतले. प्लीज लवकर घरी जा. परत नक्की भेटू... तसाच पुढे निघालो.... पाठीमागे एकदा वळून पाहिले ती तशीच जागेवर उभी होती. मला परत मागे वळून पाहणे शक्यच नव्हते....मित्रांणो, कसा "योगायोग' असतो ना, प्रत्येकाच्या आयुष्यात कोण ना कोण येत असतेच. प्रेम सुद्धा कसे असते ना?, तुमच्या सुद्धा खूप आठवणी असतीलच. तुम्ही सुद्धा त्या ब्लागच्या माध्यमातून "शेअर' करा...
Wednesday, January 14, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment