आम्ही दोघे एकाच ऑफिसमध्ये होतो. व ती माझ्यापेक्षा वयाने पण मोठी होती. पण मैत्रीचे रुपांतर प्रेमात कधी झाले ते समजलेच नाही. हळूहळू आमची प्रेम फूलू लागले. तशी ती खूप लाजाळू, घाबरट. आम्ही प्रत्यक्षापेक्षा इंटरकॉमवरच जास्त बोलायचो. ऑफीसच्या बाहेर कधी भेटसुद्धा होत नव्हती. आमच्या काळात मोबाईल नसल्याने "एसएमएस'चा प्रकारच नव्हता. पण दुसऱ्या दिवशी एकमेकांना भेटण्याची आतुरता असे. चार वर्षे आमचे प्रेम प्रकरण सुरू होते. खूप एकमेकांना समजून घेयाचो म्हणण्यापेक्षा तीच मला खूप समजावून घेयाची. कधी रागावत नसे, कुठला हट्ट नसे. खरच अशी मैत्रीणीचे प्रेम मिळाले हेच मी माझे भाग्य समजतो. परंतु घडणाऱ्या गोष्टी घडत राहतात. आणि जे नशिबात असते तेच होत असते. आणि आमच्या बाबतीतही हेच घडले. मी ऑफिसमधून सुट्टी घेऊन मित्रांबरोबर सुट्टीचा आनंद घेण्यासाठी "ट्रीप'ला गेलो होतो. व मी सुट्टी घेतल्याने तीने सुद्धा सुट्टी घेण्याचे ठरविले. कारण मी जर ऑफिसमध्ये नसलो तर तीला मुळीच करमत नसे. आणि हीच सुट्टी आम्हा दोघांना वेदना देवून गेली. आणि तिथेच सगळे संपले.... नेमके "त्या'काळात फोन आणि मोबाईलची सुविधा नसल्याने सुट्टीत आमचा संपर्क होऊ शकला नाही. आणि... आणि.... तिच्या घरच्यांनी तिचा विवाह निश्चित केला. तिचे म्हणणे घरातील कोणीही ऐकून घेतले नाही. तिला शब्द मांडण्याची एक संधी सुद्धा दिली नाही. मी ट्रिपवरून येताना तिच्यासाठी किती वस्तू आणल्या होत्या. तिच्या घरी फोन करण्याची सोय नसल्यामुळे ऑफीसमध्ये जाऊन कधी भेटेल असे झाले होते. तिला ऑफिसमध्ये किती आतुरतेने फोन केला. किती दिवसांनी तिचा आवाज ऐकणार होतो. तिला भेट वस्तू देणार होतो. बाहेरूनच तिला फोन केला. मी शहरात आलोय सांगण्यासाठी. फोन केला....समोरून आवाज हॅलो... माझे नाव सांगितल्याबरोबर तिकडून रडका आवाज... काय झाले समजायला मला मार्ग नव्हता. माझे काही चुकले का म्हणून मी सॉरी बोललो, की खूप दिवस भेटलो नाही म्हणून रागावलीस तु, पण रडणे काही थांबत नव्हते. फोनवरून तिने सर्व काही सांगितले. मित्रांनो तुम्ही विचार करा... माझी काय अवस्था झाली असेल. सर्व वस्तू तोडून-फोडून टाकल्या. जगावे की मरावे काही समजत नव्हते. आफिसला जाऊशी वाटत नव्हते. पण जे नशिबात असते तेच होत असते....
आजही मला तुझी खूप खूप आठवण येतेय.....
- एस.
Monday, January 19, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
I can understand your feeings buddy.....
ReplyDeleteDil choTa mat karo....it happens...but LIFE should go ON....